Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

‘मानसिक आरोग्य तंदुरस्त ठेवा ‘; डाॅ.मधुसूदन घाणेकर

वसुधा नाईक, प्रतिनिधी

0 5 7 3 4 6

‘मानसिक आरोग्य तंदुरस्त ठेवा ‘; डाॅ.मधुसूदन घाणेकर

स्व.भिमसिंग हिरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर आणि लोन मेळावा

वसुधा नाईक, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

पुणे : (दि 25 जुलै) समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तडफदार सामाजिक युवा कार्यकर्ते
जयंत हिरे यांनी पिताश्री स्व.भिमसिंग हिरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर आणि लोन मेळावा आयोजित केला होता. या मोफत आरोग्य शिबिरात आणि लोन मेळाव्यात अनेक नागरिक सहभागी होऊन स्व.भिमसिंग हिरे यांना आदरांजली वाहिली.

संयोजन, प्रास्ताविक, अतिथी स्वागत आणि समारोप जयंत हिरे यांनी केले. मन आणि शरिर यांचे संतुलन साधा त्याच बरोबर मिळणा-या कर्जाचा योग्य तो वापर करुन आपली स्वप्ने साकार करा असे प्रतिपादन जयंत हिरे यांनी केले. उदघाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत, विचारवंत आणि साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर, वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष वसुधा नाईक, तसेच संतोष डिंबळे, गीतांजली जाधव, डाॅ.सुधाकर जाधवर, अलका गुंजाळ , धनंजय देशपांडे, नागेश गायकवाड, विजय वाघमारे , अभिनेते महेश मोरे, पराग रोकडे आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

“आपले मानसिक आरोग्य सांभाळा, शरीर अधू झाले तरी मन अधू होऊ देऊ नका. स्वतःला काय मिळेल यापेक्षा दुस-याला काय देता येईल हा विचार आचरणात आणणारे जयंत हिरे यांचे योगदान नक्कीच समाजाला प्रेरणादायी आहे ” असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात केले. याप्रसंगी डाॅ.घाणेकर यांनी सबकुछ मधुसूदन कार्यक्रमाची झलक दाखवून उपस्थितांची मने जिंकली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 3 4 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे