0
4
8
2
9
3
बरे नाही
खरे तेच माझे सत्यता , नाकारणे बरे नाही
गोड बोलणार्याचे बोल, स्वीकारणे बरे नाही.
दुसऱ्याचे एकदा , ऐकून घे ना जरासा
वाचाळ बडबड, ती करणे बरे नाही.
लगेच का येतो , हमरीतुमरी वर दोस्ता
हात असा इतरांवर, उगारणे बरे नाही.
संयम धर जरा , सबुरीने घेत जावे
मग पश्चाताप करूनी, झुरणे बरे नाही.
कळते मलाच सारे , इतरांना काही ना कळे
अहंभावात अशा,वावरणे बरे नाही.
केव्हा काय होईल , सांगता येत नाही
संकटसमयी सरदारला,विसरणे बरे नाही.
दिपककुमार सरदार
ता, लोणार जि, बुलढाणा
0
4
8
2
9
3



