Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

दमलात नाही का हो बाबा तुम्ही

डॉ राजेश काळे 'राजस' ता. जिल्हा नागपूर

0 4 8 2 9 7

दमलात नाही का हो बाबा तुम्ही

दमलात नाही का हो बाबा तुम्ही,
मला कधी कुशीवर, कधी खांद्यावर घेतांना,
माझा छोटा घोडा बनून खेळवतांना,
हसत-खेळत बालपण फुलवतांना.

दमलात नाही का हो बाबा तुम्ही,
रोज सकाळी ऑफिसला धाव घेतांना,
पण आधी मला शाळेत सोडून
एक प्रेमळ चक्कर लावतांना.

तुमचे श्रम, तुमचे त्याग
माझ्या सुखासाठी विसरतांना,
रात्रभर जागून भविष्याचा विचार
डोळ्यांतून स्वप्ने पेरतांना.

आजही वयाच्या उतरत्या वयात,
तुम्ही तितक्याच ताकदीने उभे आहात,
माझ्या प्रत्येक क्षणाला साथ देता,
सुख-दुःखाच्या प्रत्येक वळणावर उभे राहता.

बाबा, तुमच्या प्रेमाचं ओझं नाही कधी जाणवलं,
कारण ते सदैव आकाशासारखं विशाल, आणि समुद्रासारखं अथांग होतं…
खरंच, दमलात नाही का हो बाबा तुम्ही?

डॉ राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे