स्वरगंगा…गाने तराने….!
अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर

स्वरगंगा…गाने तराने….!
‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना,
भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना..’
रक्षाबंधन…!बहीण भावाच्या अतूट नात्यातल्या अमर प्रेमाचा उत्सव.!’ अशावेळी वरील गाणं बहुतेक बहीण-भावाच्या ओठावर रेंगाळणार यात नवल नाही. कारण या गीतातून बहिणीनं भावाच्या हातावर राखी बांधन, म्हणजे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राखी बांधून घेणे एवढी च संकल्पना इथे नाही तर या बहीण भावाच्या प्रेमाला दोघांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देण असतं. 1959साली ‘छोटी बहन’ या चित्रपटात ‘बलराज सहानी आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत. ‘गीतकार शैलेंद्र’ यांनी गीतातला शब्द बाज इतका अप्रतिम बसवला आणि त्याला तितक्याच ताकदीने विविध वाद्यातून अलंकाराची तोरणा बांधीत अमृताचा धनु असलेल्या लतादीदी म्हणजेच लता मंगेशकर यांनी आपल्या ‘मधुर स्वरांनी’ गीताला प्रत्येकाच्या ओठी भिजत ठेवलं आणि हे गीत अमर केलं.
आपल्या भारतीय संस्कृतीत ‘प्रत्येक नातं हे एका पवित्र बंधनात अडकलेले पाहायला मिळत. तसंच हे बहीण-भावाचं नातं आहे.बहिण ‘छोटी असो वा मोठी, राव असो वा रंक’ या नात्याला निभावताना ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. ‘प्रत्येक सुख-दुःखात त्याच्या बरोबरच असते”. या गीतातून ही ती भावाला हेच सांगते की, हे बंधुराया हा दिवस माझ्यासाठी वाहत्या नदीतल्या स्वच्छ पाण्यासारखा आहे. जरी ही राखी साध्या दोऱ्याने घडलेली असली तरी जीवनभर तोडू नकोस… !प्रत्येक वर्षी हा सण येईल मी तुझ्या जवळ असेल वा तुझ्यापासून लांब असेल तरी पण माझ्या आठवणीत प्रेमात अंतर पडू देऊ नकोस..! आज रक्षाबंधन च्या निमित्ताने आपण हे गीत अवश्य ऐका व आणि मग तुम्हालाही वाटेल की हा “रक्षाबंधनाचा सण म्हणजे फक्त राखीपौर्णिमा नाही तर बहीणीचा भावासाठी तोच आदिमा..अंतिमा.. आहे.”
सर्व बहिण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर





