‘आभारीय शब्दसुमने’; सौ.मृदुला कांबळे
दादांचा हा जादुई मंत्रच सर्वं शिलेदारांना लिहिण्यासाठी प्रेरित करतो

‘आभारीय शब्दसुमने’; सौ.मृदुला कांबळे
दादांचा हा जादुई मंत्रच सर्वं शिलेदारांना लिहिण्यासाठी प्रेरित करतो
‘धुक्याची चादर पांघरून
दवबिंदूंने नटलेली थंड पहाट,
तुमचा फोटो पाठवा संदेशा सोबत
घेऊन आला उत्सुकता अफाट.’
आ.राहुल दादांचा हा संदेश मोबाईलवर यावा. ह्याची प्रत्येक शिलेदार वाट बघत असतो.ह्या संदेशा नंतरचा थोडासा काळ गुलदस्त्यात असतो. नक्की कुठे? हा प्रश्न मेंदूत फिरतं असतो. दादांचा हा जादुई मंत्रच आम्हां सर्वं शिलेदारांना सदैव लिहिण्यासाठी प्रेरित करतं असतो. माझे पोस्टर हायकू-काव्य समूहात झळकले.पण तब्येत बरी नसल्याने मला लगेच मनोगत पाठवता आले नाही. पण मनात इच्छा होती मनोगत पाठवायचेच.
त्या दिवशीचे हायकू चित्र पाहिले थोडे निरीक्षण केले तेंव्हा मला त्या चित्रात आनंदी, समाधानी आणि समृद्ध अशा बळीराजाचे दर्शन झाले.ज्याचे सारे जीवन शेतीत काबाडकष्ट करण्यात गेले.पण आता त्याने त्याचा कार्याचा सर्वभार पुढचा पिढीचा हाती सोपवून. तो निवृत्त झाला आहे. तरीही सवयीप्रमाणे तो शेतात फेरफटका मारून .जरा निवांत बसतं सर्वांना सूचना देत आहे.त्याचा प्रेमळ मुखावर आयुष्यभर केलेल्या कष्टाचे समाधान अन् शेतीत असलेले खरे सुख तो ह्या वयात अनुभवतोय.
माझ्या हायकू काव्याला सर्वोत्कृष्ट
स्थानी विराजमान केल्याबद्दल
समुहाचे सर्वेसर्वा आ.राहुल दादा, आ.पल्लवीताई,आ.सविताताई,
आ. वैशालीताई, आ. तारकाताई
आ.स्वातीताई, आ.वृंदाताई आ.शर्मिलाताई, आ.सुधाताई, आ.विष्णु दादा ,आ.संग्राम दादा आ.हंसराज दादा आणि प्रशासकीय टीमचे मन:पुर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. तसेच माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून मला सदैव लिखाणस प्रेरित करणारे माझे सर्व शिलेदार बंधु भागिंनंचे ही मन:पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.
सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड
सदस्या मराठीचे शिलेदार समुह



