Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

विदर्भ विमा पेंशनर्स संघटनेचे संमेलन यशस्वी; नविन कार्यकारिणी जाहीर

कामगारविरोधी धोरणांमुळे पेंशन धोक्यात : सिंह

0 5 1 7 8 7

विदर्भ विमा पेंशनर्स संघटनेचे संमेलन यशस्वी; नविन कार्यकारिणी जाहीर

कामगारविरोधी धोरणांमुळे पेंशन धोक्यात : सिंह

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि २८) भारत सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे देशाच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देणा-या कामगारांच्या पेंशनला धोका निर्माण झाल्याचे प्रतिपादन जाईंट कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्सचे महासचिव गुरप्रीत सिंह यांनी उद्घाटनीय भाषणातून केले. एलआयसी मधील सेवानिवृत्त कर्मचारी- अधिकाऱ्यांची सर्वात मोठी व प्रमुख संघटना विदर्भ विमा पेंशनर्स असोसिएशनचे २५ वे वार्षिक संमेलन स्थानिक सहकार जीवन सभागृहात सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाले.

या संमेलनाचे उद्घाटन जाईंट कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्सचे सरचिटणीस गुरप्रीत सिंह यांचे शुभ हस्ते झाले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, शिवा निमजे, वाय आर राव, पी.व्ही. मिलिंद कुमार तर अध्यक्षपदी धनराज डोंगरे उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या उद्घाटनीय भाषणातून गुरप्रीत सिंह यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, विमा उद्योगासमोरील आव्हाने व संघटनेची भूमिका सविस्तर मांडली ज्येष्ठ कामगार नेते रमेश पाटणे यांनी अनेक वर्षाच्या प्रदिर्घ लढ्यातून मिळालेली पेंशन योजना टिकविण्याकरिता संघटना बळकट करण्याचे आवाहन उपस्थित सभासदांना केले.

नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस वाय. राव व अध्यक्ष शिवा निमजे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणातून म्हणाले कि, सध्या एलआयसीत मोठ्या संख्येने होत असलेली सेवानिवृत्ती व नोकरभरती बंद असल्याने आपल्या पेंशनला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एलआयसीत नोकरभरती त्वरित सुरू व्हावी यासाठी पेंशनर्सनी मोठा लढा उभारण्याचे आवाहन केले. प्रारंभी संघटनेचा झेंडा फडकवित क्रांती गीताने पाहुण्यांचे स्वागत झाले. प्रास्ताविक भाषणातून संघटनेचे सरचिटणीस पी व्ही मिलिंद कुमार यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल सादर केला.

वार्षिक अहवालात पेंशन अपडेशन, मेडिक्लेम योजनेत सुधारणा व नोकरभरती व इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सभासदांनी आप आपले विचार मांडले. संमेलनात नविन कार्यकारिणी एकमताने मंजूर करण्यात आली. अध्यक्षपदी धनराज डोंगरे, सरचिटणीस पदी पी व्ही मिलिंद कुमार तर कोषाध्यक्ष म्हणून शेखर बन्नागरे यांची फेरनिवड करण्यात आली. यशस्वीतेसाठी सर्वश्री राजेश जाधव, के.एल. सपाटे, अजय कश्यप, नरेश अडचुले, हरी सर्मा, संजय झांझोटे, प्रणव किरण, आतिश बॅनर्जी, अभय पांडे, आर के पवनकर, एम. के. चटराज, किशोर बोंदाडे इत्यादींनी सहकार्य केले. या संमेलनाला सेवानिवृत्त विमा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे