Breaking
कविताकोकणनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

तूच शिल्पकार; पांडुरंग घोलप

0 4 8 3 0 0

तूच शिल्पकार

तूच शिल्पकार खरा
तुझ्या या आयुष्याचा
बाळगूनी स्वप्ने मोठी
घे वेध भविष्याचा…१

आयुष्य आहे वरदान
त्याला द्यावा आकार
यशस्वी जीवनासाठी
व्हावे आपणच कुंभार …२

कार्यालागी झोकून द्यावे
व्हावी उत्तरोत्तर प्रगती
धरावा मार्ग सदा नेकीचा
नकोच संकटाची गणती …४

धीर सोडू नये मुळीच
आली कष्टदशा अपार
प्रयत्न थांबवू नये कधीच
होतील स्वप्ने साकार …५

कर्तव्यनिष्ठ जीवलगांप्रती
नेहमी असू द्यावी जाण
उत्तरदायित्व समाजाप्रती
म्हणून राखावे समाजभान …६

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे