परशुराम गोपाळ म्हात्रे यांचे दुःखद निधन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
परशुराम गोपाळ म्हात्रे यांचे दुःखद निधन
हितवर्धक मंडळाचे माजी उपसचिव तथा कार्यकारिणी सभासद होते
आवास सासवने धोकवडे रहिवासी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: ( दि १८) आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे माजी उपसचिव तथा कार्यकारिणी सभासद परशुराम गोपाळ म्हात्रे यांचे शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता धोकवडे येथील रहात्या घरी वयाच्या ८४ व्या वर्षी आजारपणामुळे दुःखद निधन झाले. सायंकाळी ७.३० वाजता धोकवडे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
परशुराम गोपाळ म्हात्रे सन २००५ ते सन २०१७ याकालावधीत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सभासद, सन २०१७ ते सन २०२३ या कालावधीत उपसचिव व सन २०२३ पासून कार्यकारिणी सभासद म्हणून कार्यरत होते.
त्यांचा स्वभाव शांत व प्रेमळ होता. संस्थेच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास विषयी त्यांना अतिशय तळमळ होती. संस्थेतील व विद्यालयातील प्रत्येक घटकाला त्यांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असे.
योगासनांविषयी त्यांना खूप आवड होती. यावयात देखील ते स्वतः योगासने करीत होते. दरवर्षी २१ जून या जागतिक योगदिनला ते विद्यालयात नचुकता येऊन योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या जाण्याने एक प्रेमळ, शांत, संयमी, प्रामाणिक,अभ्यासू, व कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व हरपले आहे.त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!



