
0
6
2
9
0
4
शून्य प्रतिक्रिया
असतात अशीही माणसं
मुर्दाड मन असलेली
माणूस तरी म्हणावं कसं
माणुसकी जर मेलेली..
आक्रोश पाहून कुणाचा
काळीज नाही हेलावत
अन् दुःख पाहून कुणाचं
कडा नाहीत ओलावत..
भयावहच असतं जेव्हा
आशाच असते संपलेली
जिवंत असूनही मनाची
संवेदना ती मेलेली..
अन्याय अत्याचाराचा
निश्वास दबतो उरात
टोचत नाही काटा कुठला
सलच नसतो मनात
भयावह वाटते मला ती
शून्य प्रतिक्रिया दिलेली
कोरडेपणाची जाणीव
जेव्हा असते उरलेली..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
0
6
2
9
0
4



