जीवन आनंद
जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद.गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिली आहे. पण त्यामुळे गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जीवन संपेपर्यंत त्याचा पत्ताच लागलेला नसतो.
उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा.दिवस मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जातो. आनंद हा फुलपाखरासारखा असतो त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो. व आपण निवांत बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो.
आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुडाला पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावेच लागते.खाली येणे म्हणजे त्याची हार नसते तर ती एक उंच भरारीची सुरुवात असते त्याला जेव्हा पाणी मिळते तेव्हा त्याचा तो आनंद बघण्यासारखा असतो.
आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आनंदही एक अनुभूती आहे ती चेहऱ्यावर दिसते. समोरचा चेहरा पाहून आपल्याला कळतं की तो आनंदी आहे का दुःखी आहे.
जीवनाचा आनंद घ्या,आनंद द्या आणि पसरवा. आपल्या आजूबाजूला आनंदाचे वातावरण असेल तर आपण दुःखी होऊ शकत नाही हे एक लक्षात ठेवा. त्यामुळे आनंदाचे जीवन जगावे. आनंदाची उधळण दाही दिशात करावी.
आनंदाची बरसात जनमानसात करावी. दुःखाला सुद्धा आनंदाने सामोरे जावे. कठीण असते पण करावे तर लागते.संकटांना धीराने तोंड द्यावे. आपला आनंद आपल्या कृतीतून दिसला पाहिजे. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. तर आनंदाने जग जिंकलं असं आपण म्हणू शकतो.
वसुधा नाईक, पुणे



