
0
5
7
4
4
8
वैष्णवांचा मेळा
चंद्रभागेच्या तीरी
टाळ घेऊनी करी
मुखी नाम श्रीहरी
विठ्ठल विठ्ठल…..
पांडुरंगाचे वारकरी
गजबजली ही पंढरी
वीणा असे खांद्यावरी
विठ्ठल विठ्ठल…..
देव दीनांचा कैवारी
ठेऊनी कर कटेवरी
भक्तगणांना तो तारी
विठ्ठल विठ्ठल…..
तुळशीमाळ शोभे गळा
गोपीचंदन भाळी टिळा
भरला वैष्णवांचा मेळा
विठ्ठल विठ्ठल…..
विठुरायाचे निस्सीम भक्त
कृपादृष्टी असू दे सक्त
दर्शन दे मनोभावे फक्त
विठ्ठल विठ्ठल…..
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
5
7
4
4
8



