0
4
8
3
0
0
इतके मला पुरे आहे’
बसायला खुर्ची आहे
हातामध्ये पुस्तक आहे
डोळ्यावर चष्मा आहे
इतके मला पुरे आहे ।।१।।
निसर्गामध्ये सौंदर्य आहे
निळे आकाश आहे
हिरवी झाडी आहे
सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे
इतके मला पुरे आहे ।।२
साधे चवदार जेवण आहे
सुमधुर फळे आहेत
जेवताना ताक आहे
इतके मला पुरे आहे||3||
जवळचे नातेवाईक व मित्र आहेत मोबाईलवर संपर्कात आहेत.
भेटण्याची इच्छा असेल तेव्हा भेटतो.
इतके मला पुरे आहे||4||
डोकावर छत आहे.
कष्टाची ग्रामीण भागात
शिक्षकाची नोकरी आहे.
दोन लेकरं शिकायला आहेत.
इतके मला पुरे आहे||5||
देहामध्ये प्राण आहे.
साधू संतांची सेवा करायला मिळते.
हेच माझे भाग्य आहे.
इतके मला पुरे आहे||6||
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
4
8
3
0
0



