आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
पोलीस पाटील
0
4
8
2
8
6
पोलीस पाटील
आबा आजोबा पाटील पोलीस
रुबाबात चालायचे छाती ठोकित
माणसे बाया घाबरी आजोबास
त्याचा शब्द नाही खाली जात
एकदा पडला गावात दरोडा रात्री
आबा रात्रीची फेरी घेत गस्तीत
डोक्यावर पोत्याची घोंगडी होती
कुणी नाही ओळखलं त्यांना त्यातं
आजोबा देत पाहारा गावासाठी
पण घोंगड्यात निरीक्षण अपार
दुसर्या दिवशी माणसे सभेसाठी
आलेत सर्व माणसे घाबरत फार
आजोबांनी नावे घेत केले पुढे
दरोडेकरी माणसे गांगरून गेले
हे कसे घडले कुणासकाही न कळे
गावकरी लोकांना आश्चर्य वाटले
हा म्हणता ही गोष्ट कळली शाळेत
गुरूजी ठेवलं कार्यक्रम बहारदार
कार्यक्रमास अख्खं गाव तो-यात
पोलीस पाटलाचा केला सत्कार
कुसुमलता वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
0
4
8
2
8
6



