0
4
8
2
8
6
हरवलेली मैत्री
बालपणाची माझी मैत्री
तुझी न माझी जोडी
सखी होती जगा वेगळी
आता नाही उरली गोडी
साधी भोळी प्रेमळ यारी
एकमेकीला समजून घेणारी
विवाह बंधनात अडकलो दोघी
सुटली आमची दुनियादारी
हरवली मैत्री कुठे सापडेना
संसार रुपी वेलीवर बहरली
मुलाबाळात गुंतू गेली
माझी मैत्रीण मला विसरली
बाळ मैत्री होती निरागस
आपलेपणाचे आपुलकीचे
जिव्हाळ्याने प्रेमाने बांधली
हृदयातील शब्द ओठावर अंतरीचे
गप्पा मारत वेळ टळून गेला
सखी आनंदात घरी गेली
दुसरा दिवस कधी उजाडला
सुखदुःखाच्या गोष्टी सांगत राहिली
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
============
0
4
8
2
8
6



