Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

ग्रामपंचायत सावळी (बिबी) चा पंचायत राज अभियानात उत्स्फूर्त सहभाग

हिंगणा तालुका प्रतिनिधी

0 5 4 7 4 5

ग्रामपंचायत सावळी (बिबी) चा पंचायत राज अभियानात उत्स्फूर्त सहभाग

मोक्षधाम सौंदर्यीकरण व स्मृतिउद्यान-“मृत व्यक्तीच्या नावाने एक झाडं” हा उपक्रम

हिंगणा तालुका प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर/हिंगणा :-(दि २२) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेले असून या अभियानामध्ये गट-ग्रामपंचायत, सावळी (बिबी) यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच जलसंधारण यांची कामे करून, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सुद्धा अभियानामध्ये सहभागी होऊन एक आदर्श घडवू शकते हे दाखवून दिलेले आहे.

या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सावळी(बिबी) मध्ये, संपूर्ण गावं, शाळा , अंगणवाडी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय CCTV च्या निगराणीत आणण्यात आले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत मिळणार आहे. तसेच सरपंच रुपेश झाडे यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमी चा कायापालट करून, मोक्षधाम सौंदर्यीकरण व स्मृतिउद्यान-“मृत व्यक्तीच्या नावाने एक झाडं” हा उपक्रम राबवून वृक्षलागवड करण्यात आली आहे.

गावातील नागरिकांकडून प्लास्टिक बॉटल विकत घेऊन त्या प्लास्टिक बॉटल पासून, मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे तसेच गावातील मुलांकडून जंगली वनस्पतीची बियाणे माफक दरात विकत घेऊन ग्रामपंचायती मार्फत त्या बियाण्याची “बीज बँक” तयार करून रोपवाटिका तयार करण्यात आलेली आहे.

सर्व शाळा व अंगणवाडी च्या भिंती बोलक्या तयार करण्यात आल्या असून, डिजिटल शिक्षण यामधून दिले जात आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने परसबागेची निर्मित करून तेथील भाजीपाला हा मध्यान्य भोजनासाठी वापरात आणून मुलांना सकस आहार पुरविण्यात येत आहे,
तसेच आठवड्यातून एकदा श्रमदान कार्यक्रम घेऊन गाव सफाई करून स्वछता करण्यात येते व चारही गावात जलसंधारण विभागापासून साठवण बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणी नाल्यांचे खोलीकरण करून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

या अभियानात सरपंच रुपेश झाडे व त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी वसंत उमाटे तसेच गावातील युवक मंडळ, बचत गट, महिला मंडळ, विद्यार्थी हिरीरीने सहभागी असून, गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार, यांचे मार्गदर्शनाखाली, ओ. के. मेश्राम, कृषी अधिकारी, प. स. हिंगणा हे संपर्क अधिकारी म्हणून अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे