‘आभारीय दोन शब्द’;माधुरी काळे
विचारांची देवाण-घेवाण करणारा परिवार ‘मराठीचे शिलेदार’
सर्वप्रथम ‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या सर्व प्रशासकीय टीमच्या कार्याला माझा सलाम. समूहातील सर्व वंदनीय साहित्य प्रभूंना माझा नमस्कार. शालेय कामकाजातून समुहासाठी वेळ देता येतं नाही, पण मध्ये मध्ये लेखन करते. नियमित लेखन होतं नसल्यामुळे दिलगिरी व्यक्त करते. या समूहात आल्यापासून मला माझ्यामध्ये असणारा न्यूनगंड दूर करायला बरीच मदत झाली. हा समूह नुसता एक समूह नसून आचार विचारांची देवाण-घेवाण करणारा नवोदित लेखकांना कवींना प्रोत्साहन देणारा अतिशय सुंदर असा परिवार आहे.
राहुल सरांचा मेसेज ‘तुमचा फोटो पाठवा’, असे वाचन करताच मला खूप आनंद झाला. मला वाटलेच नाही त्या दिवशी की, कवितेची निवड ही आजची सर्वोत्कृष्ट कविता यासाठी होईल. पण पण समूहात पोस्टर बघताच आनंद द्विगुणीत झाला.
शिलेदार समूहांगणी
गवसले शब्दांचे मोती
सदा काव्य लेखनाच्या
तेवत राहाव्या ज्योती
आज माझ्या कवितेला माझ्या भावनांना मी शब्दरूप दिलं आणि ते परीक्षकांच्या हृदयाला भिडलं यापेक्षा मोठे समाधान असू शकत नाही. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनानेच आज मी इथे आहे. मी तुम्हा सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करत आहे. कारण प्रत्येक प्रतिक्रिया आणि कौतुकाच्या शब्दाने मला आणखी उत्तम लिहिण्याची प्रेरणा दिली आहे. आज माझ्या कवितेला आणि माझ्या शब्दांना सन्मान प्राप्त झाले ती माझ्यासाठी एक आयुष्यात मिळालेली प्रेरणा आहे हे मी मनापासून मानते.
“कशी करावी सुरुवात” शब्द उच्चारताच माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो म्हणजे माझा स्नेहमिलन सोहळा. माझ्या भावनांना मी काव्य स्वरूपात तुमच्या समोर सादर केले आणि तुम्ही त्याचा सन्मान केला. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार. मराठीचे शिलेदार समूहाचे आधारस्तंभ आदरणीय राहुल दादा, आ. पल्लवी ताई आदरणीय सविताताई आ. वैशालीताई आ.स्वातीताई आ.वृंदाताई आ. शर्मिलाताई आ. विष्णू दादा आ. संजय दादा तसेच माझी सखी मिता, माझे शिक्षक प्रा. झाडे सर त्याचबरोबर शुभेच्छा व आशीर्वाद देणारे माझे सर्व शिलेदार बंधू भगिनी आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.
कवयित्री सौ माधुरी काळे
वणी, जिल्हा यवतमाळ
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



