0
4
8
2
9
0
कहार समाजाचा वर-वधू मेळवा 19 रोजी
शहर प्रतिनिधी नागपूर
नागपूर: (दि १५) : कहार समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने येत्या 19 जानेवारी रोजी (रविवारी) सकाळी 11 वाजता. शिक्षक सहकारी बँक सभागृह गांधीसागर नागपूर येथे आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी आमदार विकास ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन महाल नागपूरचे अतुल मोहनकर, माजी महापौर दया शंकरजी तिवारी, माजी आमदार विकास कुंभारे, माजी नगरसेवक मुन्नालाल गौर, आणि नगरसेविका सरलाजी नायक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कहार समाजांच्या समाज बांधवांनी या वधू- वर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष कमलेश सोंधिया यांनी केले आहे.
0
4
8
2
9
0



