“अर्पण करिते आभारीय शब्दफुले”; सारिका मोरे
“अर्पण करिते आभारीय शब्दफुले”; सारिका मोरे
आदरणीय समूह प्रशासक राहुल दादा, सविता ताई, स्वातीताई, विष्णू दादा, तारका ताई, उरकुडे दादा व सर्व आदरणीय सहप्रशासक माझ्या रचनेस बुधवारीय काव्ययत्न स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बारामध्ये निवडल्याबद्दल आपले मनस्वी मनस्वी धन्यवाद.
मराठीचे शिलेदार समूहात काल झालेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बारामध्ये माझी रचना प्रथम निवडली गेली आणि अनपेक्षित सुखद सुखद धक्का बसला.
‘मराठीचे शिलेदार’ समूह अनेक कवी कवयित्रीना हक्काचे व्यासपीठ व लेखणीला बळ देण्याचं काम सदोदित करतो आहे. माझ्यासारख्या नवोदितांना तर साहित्याची कार्यशाळाच आहे. आतापर्यंत समूहाने मला व कैक शब्द प्रभूंना भरभरून दिले आहे .त्यातून उतराई होणे नाहीच. आदरणीय सविता ताई, स्वाती ताई, विष्णू दादा ,तारका ताई आपल्या सुंदर लेखणीचे अनेक गुण टिपून ठेवावेत असेच नेहमी वाटते. पुनश्च एकदा सर्व यशस्वी शब्द प्रभूंचे अभिनंदन !! व शिलेदार समूहाचे मनस्वी आभार…!!
कवयित्री सौ.सारिका मोरे
ता.वाई, जि.सातारा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह



