0
4
8
2
9
4
आई
आई गेल्यावर कळतो
फक्त जीवघेणा भास .
वस्तूंना त्या उरतोच,
तुझ्या हातचा स्वयंपाकचा वास.
जिथे तिथे फक्त तुझ्या,
आठवणी त्या पेरलेल्या.
फक्त येतात सोबतीस ,
संवेदना त्या उरलेल्या.
सगळ्यात असूनही मग,
उरतो तो रिकामेपणा.
खोटं खोटं हसण्याचा,
दमवतो दिखावेपणा.
काॅलेजला जाताना काही
विसरलं का म्हणून ,
विचारायची तू सदा .
डोळ्यात तुझे चित्र ,
तुझी आठवते अदा.
निरोपाच्या असे समयी
डोळ्यात पाणी,चहा गोड.
खोल आत हरवून बघायची ,
आठवण तुझी जुनीच आहे .
खूप काही मागे ठेवी,
आई उरते ही नंतर .
कितीही केली भटकंती ,
नाही येत तुझी सर.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
4
8
2
9
4



