Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

आगरी समाज संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 6 4 1 5

आगरी समाज संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग, ( ता २८ मे) आगरी समाज संस्था अलिबाग आणि छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी तसेच सेंट विल्फ्रेड ग्रूप ऑफ कॉलेजेस, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिर रविवार, दिनांक 24 मे 2026 रोजी भाग्यलक्ष्मी हॉल, अलिबाग येथे सकाळी 9 ते 12:30 या वेळेत अत्यंत उत्साहात आणि भव्यदिव्य वातावरणात यशस्वीरित्या पार पडले.
विद्यार्थी आणि पालकांनी कार्यक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण हॉल तुडुंब भरला होता.

कार्यक्रमाची सुरुवात नियोजित वेळेत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कु. सई पाटील हिने आपल्या सुमधुर आवाजात ईशस्तवन सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. संस्था सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी समर्पित भावनेने कार्य करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात प्रख्यात करिअर मार्गदर्शक, प्रेरणादायी वक्ते आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स गौरवित प्रा. विजय नवले यांनी विद्यार्थी व पालकांना अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. अलिबाग परिसरात वाढत्या औद्योगिक आणि व्यावसायिक संधी, बदलते शैक्षणिक प्रवाह, नवीन करिअर क्षेत्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे संधी म्हणून कसे पाहावे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार श्री. महेंद्र दळवी साहेब यांनी अशा प्रकारचे शैक्षणिक आणि समाजाभिमुख कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आगरी समाज संस्थेचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीची जबाबदारी स्वतः स्वीकारली पाहिजे, असे सांगताना कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवता येते याचे आपण स्वतः उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

यावेळी अलिबाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. किशोर साळे साहेब यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली. पालकांनीही जाती धर्म भेद न करता राबवलेल्या अशा उपक्रमांचे मनापासून स्वागत करत आगरी समाज संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशामागे संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांची निःस्वार्थ मेहनत आणि समर्पण महत्त्वाचे ठरले. या कार्यक्रमाची संकल्पना आगरी समाज संस्थेचे शैक्षणिक कार्यक्रम प्रमुख श्री. मिलिंद धोदरे सर यांनी मांडली. शैक्षणिक कार्यक्रम समितीतील सर्व सदस्यांनी ती यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

अलिबाग-मुरूड परिसरातील तब्बल ४० शाळा आणि १६ ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे ४५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना कार्यक्रमासाठी प्रेरित करण्याचे मोठे आणि आव्हानात्मक काम कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.श्री. मिलिंद धोदरे, श्री. राजेंद्र पाटील, सौ. शुभांगी म्हात्रे, श्री. शशिकांत मिठाग्री, श्री. जयवंत पाटील, श्री. अंकुश पाटील, श्री. संदेश म्हात्रे, श्री. प्रभाकर ठाकूर, श्री. इंद्रजित पाटील, श्री. बिपीन टेमकर आणि श्री. मनोहर पाटील, लक्ष्मण खाडे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्री. रविंद्र ठोंबरे सर यांनी आकर्षक आणि सुबक रांगोळी काढून कार्यक्रमस्थळाची शोभा वाढवली. श्री. प्रभाकर ठाकूर, सुनिल तांबडकर, उदय म्हात्रे, जयवंत पाटील, सूर्यकांत म्हात्रे, राकेश म्हात्रे, मिलिंद पाटील, वैभव पाटील, मेहुल पाटील, प्रवीण भगत, श्रेयस ठाकूर, आदित्य म्हात्रे, इंद्रजीत पाटील, शशिकांत मिठाग्री, जयेंद्र मिठागरी, दिपश्री पाटील आणि दिप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने जागेवर बसवून संपूर्ण बैठक व्यवस्था शिस्तबद्ध ठेवली.

सौ. जागृती पाटील, शुभांगी म्हात्रे आणि राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन आणि माईकचे उत्कृष्ट नियोजन केले. त्यांच्या सुसूत्र संचालनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी झाला. ॲड. सचिन पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते समारोपापर्यंत प्रत्येक जबाबदारी अत्यंत ऊर्जेने आणि समर्पणाने पार पाडली. या संपूर्ण उपक्रमात संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री. अनंत म्हात्रे, दत्तात्रेय भोपी, नंदकुमार पाटील यांनी सकाळपासून शेवटपर्यंत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. भाग्यलक्ष्मी हॉलचे मालक श्री. राकेश थळे यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच तुषार फोटो स्टुडिओचे मालक आणि अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. तुषार थळे यांनी संपूर्ण नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत संस्थेला मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. सौ. शुभांगी म्हात्रे, जागृती पाटील, दिप्ती पाटील, सुप्रिया ठाकूर, रेश्मा म्हात्रे, प्रीती पाटील, दर्शना पाटील, सई पाटील आणि दिपश्री पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमात प्रभावी योगदान दिले. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि समर्पणाने काम करत हा कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने यशस्वी करून दाखवला. या कार्यक्रमामुळे अलिबाग, मुरूड आणि पेण परिसरात आगरी समाज संस्थेच्या समाजाभिमुख कार्याची व्यापक दखल घेतली जात असून संस्थेच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 1 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे