Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रबीडमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘आभाळाशी नातं सांगणारं, हेच गवताचं पातं’; शर्मिला देशमुख

मंगळवारीय 'आम्ही बालकवी' काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 0

‘आभाळाशी नातं सांगणारं, हेच गवताचं पातं’; शर्मिला देशमुख

मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ काव्यस्पर्धेचे परीक्षण

गवताच पातं वाऱ्यावर डोलतं
डोलताना म्हणतं खेळायला चला…

इयत्ता दुसरीची “गवताचं पातं” ही कुसुमाग्रजांची बालकांना मोहिनी घालणारी कविता. वेगवेगळ्या तालासुरात गाऊन, मन प्रसन्न करून निसर्ग चित्र वर्गामध्ये बालकांच्या समोर उभी करण्याची ताकद असणारी ही कविता .निसर्गात लहरून ,बहरून ,खेळून आल्याचा भास नक्कीच शिकवताना शिक्षकांसहित बालचिमुकल्यांनाही होतो. शाळेत कविता शिकवताना वय विसरून नाचून गाताना मग्न होणारे आमचे शिक्षक बंधू भगिनी कशी तल्लीन होत असतील याची कल्पना आज आली.

आज इयत्ता दुसरीच्या कवितेचे काय घेऊन बसलाय? अहो , आजच्या “बालकवी “समूहातील स्पर्धेचा विषय नाही का “गवताची पातं “. आपल्या राहुल दादांची कल्पकता म्हणजे अफलातूनच ! आज थेट कुसुमाग्रजांची आठवण देऊन गेला विषय .. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या बालमनातून साकारलेला हा विषय आज राहुल दादांच्या मनाला स्पर्शून गेला आणि पाऊस पडल्यानंतर एक ते दोन आठवड्यात हिरवळ पसरून लहरतांना दिसणारं गवताचं पातं आज बालकविता समुहात मनमुरादपणे वेगवेगळ्या कल्पनारूपी वाऱ्यासह डोलतानाचा अनुभव भरभरून घ्यावयास मिळाला .अगदी कुसुमाग्रजांच्या कल्पनेला जणू आमच्या बाल शिलेदारांनी पंखच दिले.

मऊशार अंगाची गवताची पातं ,त्यावर सौंदर्याने बहरणारी विविध रंगी नाजुक साजूक आकर्षक फुले ,त्यावर भिरभिरणारी रंगीत संगीत फुलपाखरे , घिरट्या घालणारे भुंगे, मधमाशा ,किट पतंगे आणि गुंजारव करणारी आमची बालमने …खरंच गवताचं पातं आज हिरव्या हिरवाईवर आनंदाने डोलत असेल, आज बालकाव्यसमूह त्या पातीच्या हिरवाईत इतका गुंतला की मनात मंद झुळके सोबत नाचणारे पातं जणू शिलेदार बनले आहेत आणि तेच नाचत गात आहेत असा क्षणभर भास झाला. बालकाव्य स्पर्धेत न उतरणारे ,आपल्याला जमेल का अशा गैरसमजात वावरणारे, फक्त वाचक बनून राहणारे बालगडीही आज प्रत्यक्षात मैदानात उतरले आणि आज समूहात गवताचं पातं चिंब होऊन हर्षोल्लासात दिवसभर डोलत राहिलं .एकमेकांच्या रचनांना मनमोकळी दाद देत हसत -खेळत निसर्गामध्ये मनसोक्त रमणारा समूह पाहून मन मयुरासम फुलले.

आज गवताचं पातं कोणी सैरभर वाऱ्यावर तर कोणी मंद नाजूक झुळूकेवर डोलवलं. वर तरंगणाऱ्या सुंदर कोमल फुलांना जणू मोतीच आल्याची उपमा मिळाली, फुलपाखरे ,पाऊस, ढग ,हिरवळीतून बघता बघता गवताचं पातं मामाच्या गावी जाऊन मामा-मामी सोबत बालपण जगून आलं. वेगवेगळ्या जिज्ञासा बालमानाचा ठाव घेत होत्या. बी कोण पेरतं ,पाणी कोण घालतं, कापलं तरी पुन्हा कसं फुटत, दव बिंदूंची मजा आणि ती पाहण्यासाठी लवकर उठावे लागते हा मोलाचा संदेश आज समूहात मिळाला.

विशाल काय वृक्ष ना परी तू रस्त्यावरचे गवत बन
पंख कमी पडले भरारीस जरी
जपावे दुसऱ्यांचे मन
आनंद द्यावा क्षणभर वाटून
सांगते गवताचं पातं
विशाल आभाळाशी जणू
त्याचं घट्ट जोडलेलं नातं…..

आकाशातील ढग जेव्हा वसुंधरेच्या भेटीसाठी पाऊस रूपाने येतात तेव्हा वसुंधरा प्रसन्न होऊन हे हिरवाईचं लेणं सर्वांना बहाल करते. ” निसर्ग स्वतःच, स्वतःला नटवतो” हेच खरे ! कितीतरी गवतफुले ,रान फुले सौंदर्याने मोहिनी घालतात त्यांना पाहण्यासाठी पाय क्षणभर अडखळतात . या निसर्गाचं लेणं असंच जपूया आणि निसर्गासवे असेच गवताच्या पात्याप्रमाणे लहरू या, खेळूया, बागडू या, बहरू या ,नाचू या ,गाऊ या .धावपळीच्या या जीवनात लहानाचे मोठे झालो आणि बालपण हरवून गेलं ते बालपण पुन्हा जगून घेऊ या. कवितेचा विषय अतिशय सुंदर आणि निसर्गप्रेमींना आकृष्ट करणारा असाच होता. आदरणीय राहुल दादांच्या कल्पकतेला सलाम!! मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार.

गवताचं पातं मलाही खुनावतयं
खेळण्यासाठीच मलाही बोलावतयं
मन माझं हिरवळीत मिसळतंय
पातं बनून आनंदाने डोलतयं…
चला तर मग, कोण कोण येतय ? माझ्यासोबत गवताबरोबर, पात्याबरोबर खेळण्यासाठी?

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक, परीक्षक, कवयित्री,लेखिका
मराठीचे शिलेदार समूह

2/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे