Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरभंडारामराठवाडामहाराष्ट्र

अविस्मरणीय प्रसंग आणि गुरूजी असल्याचा अभिमान; गायके गुरूजी

शिक्षक दिन विशेष

0 4 8 2 9 7

अविस्मरणीय प्रसंग आणि गुरूजी असल्याचा अभिमान; गायके गुरूजी

नमस्कार सर्वांना मी आदिनाथ गायके पवित्र पोर्टल मधून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणा कोरंभी ताल पवनी जिल्हा भंडारा येथे शिक्षण सेवक नियुक्ती झाली.परंतु फक्त कागदोपत्री शिक्षण सेवक प्रत्येक्षात मुख्याध्यापक कारण येथे 11 विद्यार्थी आहे आणि एकच शिक्षक मग आता मी शिक्षणसेवक आणि मुख्यध्यापक पण .प्रथम 12 वर्ष अहमदनगर येथे खाजगी सस्थेते विना अनुदानित मध्ये काम केल्या नंतर आज नशिबाने साथ देत जिल्हा परिषद शाळेत काम करण्याचा योग आला.प्रथम मनात थोडी भीती होती की आपल्या घरापासून 600 km दूर जात आहे कोणी ओळखीचे नाही काही माहिती नाही कधी आयुष्यात भंडारा पाहिलेले नाही.कोणतीच माहिती नसताना आता समोर खूप मोठे आव्हाने उभे होते. परंतु या प्रवसात असे काही माणसे भेटले की हा प्रवास नक्कीच सोपा आणि सोयीस्कर होईल असे जाणवत आहे.प्रथम त्या मध्ये बिटाळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बावनकर सर असतील कुंभारगावे सर असतील नागपुरे सर यांनी मला शालेय प्रशासनात मधील सर्व माहिती दिली मी रुजू होण्याआधी सदर शाळेतील मुख्याध्यापक कामटे सर यांनी रिटायर झाले तरी सुद्धा त्यांनी एक दिवस शाळेत येऊन शाळे बद्दल आणि तेथील गावातील भौगोलिक सर्व माहिती दिली.आणि या प्रवसा सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे कोरभी शाळेचे मुख्याध्यपक श्री खाटीक सर कारण प्रथम शाळेत गेल्यानंतर पवनी ते शाळा जाणार कसे हा विषय होता कारण पद स्थापना संपुदेशना वेळी थोडीसा गोंधळ झाला की ठाणा ही शाळा 2 km आहे पवनी पासून परंतु प्रत्येक्षात सदर शाळा ही 10 km आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सदर शाळेच्या वाटेने कोणतेच प्रवासाचे साधन उपलब्ध नाही तसेच सदर शाळेच्या वाटेवर दुपारी 4 नंतर वन्य प्राणी असतात बिबट्या दिसतात असे स्थानिक यांनी सांगितले.मग या सगळ्या प्रवासात सर्वात मोठा प्रश्न हा की आता शाळेत जाणार कसे येणार कसे राहणार कुठे परंतु या सगळ्यात महत्वाचा वाटा श्री खाटीक सर यांनी उचलला आणि सर घाबरु नका मी आहे तुम्ही माझ्या सोबत गाडीवर चला आणि त्यांची शाळा आणि माझी शाळेत अंतर असून पण सर ने एका गावातील मुलाला सांगितले की ठाणा शाळेत जाऊन गायके सर यांना घेऊन ये.मग प्रश्न होता आता पहिला दिवस राहणार कुठे परंतु सर दिवसभर शाळेत काम करून लगेच माझ्या सोबत पूर्ण पवनी येथे फोन फिरवले आमचे एक गुरुजी आले त्यांना रूम पाहिजे तर असेल तर सांगा.ऐकून खूप बर वाटल कारण आयुष्यात प्रथमच कोणी तरी गुरुजी म्हणून उल्लेख केला आणि जो आधार दिला जे सहकार्य केले ते आयुष्यात कधीही न विसरणारा आहे स्वतः सर मझ्या सोबत त्यांच्या गाडीवर पूर्ण पवनी मध्ये 10 ते 15 ठिकाणी रूम पाहण्यासाठी आले आणि मग एक रूम फायनल केली परंतु प्रश्न हा आता रूम भेटली पण अजून रूम साफ करणे आहे समान काहीच नव्हते मग सर म्हणे तुम्ही मझ्या घरी चला आणि तुम्ही माझ्या घरीच राहा सर यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने जे काही सहकार्य केले त्याबद्दल मी खूप ऋणी आहे आयुष्यात असे माणसे भेटतात की आपण त्यांनी केलेले सहकार्य मदत कधीच शब्दात किंवा कोणत्याच स्वरूपात फेडू शकत नाही.सर यांनी आपल्या स्वतः च्य घरी मला राहण्यासाठी जागा दिली चहा नाष्टा जेवण हे तर सोडा सर यांनी स्वतः मला अंघोळ साठी गरम पाणी करून दिले या वेळी डोळ्यात अश्रू आले मला थोड पण जाणवलं नाही की मी घरापासून 600 km दूर आहे.खरंच या सर्वांचे मनापासून आभार आणि मी या सर्वांचे ऋण शब्दात फेडू शकत नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे