मालेवाड्याच्या ‘प्रथम नागरिक व ग्रामसेवकास’ राष्ट्रसंताचा पडलाय विसर!
प्रतिनिधी: रजत डेकाटे, मालेवाडा

मालेवाड्याच्या ‘प्रथम नागरिक व ग्रामसेवकास’ राष्ट्रसंताचा पडलाय विसर!
संत महात्म्याच्या जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमास फाटा
धार्मिक संस्कृतीच्या गावात राष्ट्रसंतांना तिलांजली
प्रतिनिधी: रजत डेकाटे, मालेवाडा
बिनधास्त न्यूज मिडीया
भिवापूर/ मालेवाडा: (दि ६ मे) विदर्भ ही संताची भूमी म्हणून सर्वदूर नावलौकिक असूनही, भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा विसर पडला आहे. मालेवाडाचे प्रथम नागरिक, सरपंच व ग्रामसेवक, सचिव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची यंदा जयंती साजरी केली नाही.
विशेष बाब म्हणजे मालेवाडा हे गाव धार्मिक वृत्तीचे असून इथे अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजरा केल्या जातात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्राम विचारावर नेहमी कीर्तनातून जनजागृती करीत असत. संत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेला तिलांजली देण्याचा घाट घातलेला येथे दिसून येत आहे.
सरपंच व सचिव यांना राष्ट्रसंतांच्या जयंती विषयी माहितीसाठी फोन कॉल केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे कळले. हेतूपुरस्सर ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत नसल्याचे समजते.
मालेवाडा हे गाव धार्मिक वृत्तीचे असून इथे चैत्र महिन्यात सात दिवसांचा सप्ताह केला जातो. मात्र यात वारकरी संप्रदायाला या गावामध्ये राष्ट्रसंतांची जयंती साजरी करण्याचा हेतू नाही का? हा प्रश्न जनमानसात केला जात आहे. सरपंच आणि सचिव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अवमान केल्याचे वृत्त पुढे येत असून यावर स्थानिक शासन प्रणाली कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रसंताच्या विचारांना तिलांजली देणा-या सरपंच व ग्रामसेवक यांना कुणाचे अभय आहे का? त्यांच्या मनमानी कारभारावर शासन वचक बसवेल का? असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहे.



