ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
शिल्पकार
भुमेश्वरी सातपुते -खोंडे ता.उमरेड जि. नागपूर

0
5
5
6
4
6
शिल्पकार
अरे माणसा माणसा, नको बनू गुन्हेगार
तुझ्याच रे जीवनाचा, तूच आहे शिल्पकार।।धृ।।
अरे माणसा माणसा, नको करू रे व्यसन
स्वतःच्याच हाताने नको रचू रे सरण
अरे माणसा माणसा, किती तू लाचार
स्वार्थासाठी स्वतःच्या करतोस भ्रष्टाचार .
अरे माणसा माणसा, कधी येईल रे चेव
पोरासाठी पोरीचा घेतोस तू जीव
अरे माणसा माणसा, असा कसा रे अविचारी
क्षणिक सुखासाठी झालास रे बलात्कारी
भुमेश्वरी सातपुते -खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर
==========
0
5
5
6
4
6



