0
4
8
2
8
6
संवेदना
वेदना संवेदना झाल्या तर
आकांत गगनी भिडत नाही
आपुला आपल्याशी संवाद
इतरांशी वाद रहात नाही…
नसेच कुणाविरूद्ध तक्रार
जसे आहे त्याचा स्विकार
नियती असो की प्रारब्ध
नकोच कशालाही नकार…
मनाची तयारी झाली तर
कुठे कांहीच नडत नाही
पर्वतप्राय संकटातही मग
कुणावाचून अडत नाही…
एखादी हार झाली तरी
सारे काही संपत नाही
स्वतःच होता आधार
धीर कदापी खचत नाही…
असतेच सुप्त बलस्थान
त्याची पारख होत नाही
कधी बळावतो न्युनगंड
हेच कळता कळत नाही…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
0
4
8
2
8
6



