0
4
8
2
9
7
झुळझुळ वारा
तू सांजवेळचा झुळझुळ वारा
मी संथ वाहते खळखळ धारा… //
स्पर्श लहर तुझी शरीरी शहारा
हर्ष देई मनाला माझा किनारा.. //
स्वभावधर्म दोघांचा असे प्यारा
परोपकारी कर्म नसे हेतू न्यारा.. //
कधी होशी वादळ घोंगावणारा
मी ही प्रपात कधी कोसळणारा.. //
कधी सौम्य कधी रौद्र नजारा
कधी अर्थ कधी अनर्थ पसारा.. //
विष्णू संकपाळ, बजाजनगर
छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
7



