
0
5
1
7
9
4
मोरपंख
तुझे मोरा मोरपंख
किती छान छान
पक्ष्यांचा राजा तू
आहेस रे महान
मोर पिसारा फुलवून
नाचतोस रानावनात
पक्षीही सूर देई तुला
आंब्याच्या त्या बनात
नाच तुझा बघायला
सारी पाखरही आतुरली
झुळूक आली वाऱ्याची
पाने फुलेही डोलली
मोरपंख तुझे शोभिवंत
साऱ्यांचे लक्ष वेधून घेती
असे कृष्णाच्या डोक्यावर
दारातही त्यास शुभ माणती
तुझ्या पंखातले रंग बघून
भासे आकाशातले इंद्रधनू
फारच तुझ्यात नवलाई
वाढवी तुज सौंदर्य जणू
प्रतिमा नंदेश्वर
ता मूल, जि.चंद्रपूर
0
5
1
7
9
4



