ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध
पैंजणांचा आवाज
डॉ. बालाजी राजूरकर हिंगणघाट जि. वर्धा

0
4
0
9
0
3
पैंजणांचा आवाज
आवाज तुझ्या पैंजणांचा,
मज ओळखीचा वाटतो;
कान्हाच्या बासरीसमान,
मनात माझ्या दाटतो.
निरागस चेहरा तुझा,
जशी कृष्णाची राधा तू;
मीच तुझा कृष्ण, माझ्या
शिवाय वाटते अर्धी तू.
नजरेचा कटाक्ष तुझा,
हेलकावे मन खाते;
गालावरची खळी तुझी,
स्वप्नांत घेऊंनी जाते.
कधी वाटते डुंबून जावे,
काळ्या भोर डोळ्यात;
उतरावे खोल हृदयात,
वास्तव्य करावे तनात.
कधी न यावे अश्रू तुज,
आले तर आनंदाचे असावे;
मोती बनूनी गालावरुनी,
घरंगळत ओंजळीत यावे.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
========
0
4
0
9
0
3





