Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सुखाचा मंत्र

गोवर्धन तेलंग पांढरकवडा, जि.यवतमाळ

0 4 8 2 9 0

सुखाचा मंत्र

सुखाचा मंत्र घेऊ ,दिधला बा भीमाने।
या गवसणी घालू ,सूर्यास शिक्षणाने।।
सुख म्हणजे काय,जीवनी ओळखारे ।
भ्रमिष्ट करणारे ,आहे माणसे दिवाणे।।
पैसा अडका काही, सुखास देत नाही।
कर्म करूनी थोर , जगावे आनंदाने।।
जात पात धर्माचे , गाऊ नका गोडवे।
स्वार्थाने केली आहे,व्यवस्था माणसाने।।
मानवता पाळूनी , जीवनी जगा सारे।
वागणे सांगितले , आता संविधानाने।।
आई वडील हेच , दैवत माणसाचे।
भक्तीला अर्थ नाही, दगड पुजनाने।।
जीवाला जीव लावू, दुःखात साथ देऊ।
जन्म दिला तुजला , म्हणून निसर्गाने।।
इथे अधोगतीचे , कारण हेच आहे।
लोचनी दृष्टी नाही , अजून विज्ञानाने।।

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे