Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

कान्होली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

कान्होली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

कान्होली : मित्र परिवार तसेच सार्वजनिक वाचनालय, कान्होली च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने व आनंदाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. .यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील योगदान आणि आदर्श कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

देशभक्तीपर घोषणा, शिवगर्जना व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसर शिवमय झाला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनराजजी आष्टणकर (माजी जि.प.सदस्य) देवेंद्रजी आष्टणकर (सरपंच, कोतेवाडा) रविंद्रजी कुंभारे (सकाळ पत्रकार) मिलिंद कोवे (उपसरपंच, कान्होली), गजानन खंडारे (माजी सरपंच, कान्होली), सौ. दीपाली वलके (ग्रा.पं. सदस्या) सौ. सुनीता वलके (ग्रा.पं. सदस्या) लीलाधर तुरारे (ग्रा.पं.सदस्य, गुमगाव) संतोष वानखेडे, अरविंद उईके, पांडुरंग कोवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन मित्र परिवार, कान्होलीचे प्रदीप इटनकर, अरविंद कोवे, विकास करपते, प्रकाश दडमल, निखिल वंजारी, नंदू कुमरे, सनी कोवे, अक्षय गोंडगे, रुपेश इटनकर, किसना मडावी, मंगल कोवे, भावेश वलके, गौरव गोंडगे, सोनाली करपते, कल्पना कोवे, शारदा करपते, शीतल कोवे, आरती करपते, आशा कोवे, नीता रंदई, पूजा कोवे तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या सदस्यांनी परिश्रमपूर्वक केले. गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आचल कोवे यांनी तर सरते शेवटी भाग्यश्री आडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे