भाजपाचे युवानेते अजय बोढारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
भाजपाचे युवानेते अजय बोढारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
शहर प्रतिनिधी, नागपूर
नागपूर: (दि.१७); भारतीय जनता पक्षाचे युवा नेते माजी सभापती तसेच कामठी मौदा विधानसभेचे प्रभारी युवा नेते ज्यांनी राजकारणातून लोकांची सेवा करण्याचे व्रत घेतले आहे असे सन्माननीय “अजयभाऊ बोढारे” यांचा (दि.15) 47 वा वाढदिवस हा सोहळ्याप्रमाणे साजरा करण्यात आला. त्यांनी आपला वाढदिवस मूकबधिर विद्यालयात दिव्यांगांना फळ वाटप व ज्येष्ठ नगरीकांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला नागपूरातील बरेचसे नामधारी व्यक्ती हजर होते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे , टेकचंदजी सावरकर यांनी कार्यक्रमाला येऊन अजय भाऊ बोढ़ारे यांना व यांच्या परिवाराला अजय भाऊ बोढारे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यातर्फे अजय भाऊ बोढ़ारे यांना वाढदिवसाच्या फार मोलाच्या शुभेच्छा दिल्या आणि अजय भाऊ बोढ़ारे पक्षाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर राहतात व पक्षात दिलेल्या प्रत्येक कार्याला चोखपणे पार पाडतात असे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितले.
त्यांनी पुढील वाटचाली करिता व दीर्घ आयुष्यासाठी अजय भाऊ यांना शुभेच्छा दिल्यात तसेच नागपुरातील हजारो लोकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊन कामना केल्यात.



