ऋणगंधित शब्दपुष्प अर्पिताना; राजश्री मिसाळ ढाकणे
राजश्री मिसाळ ढाकणे बीड

ऋणगंधित शब्दपुष्प अर्पिताना; राजश्री मिसाळ ढाकणे
जादुई वाटे
तीन शब्द दादांचे
आनंद दाटे
सर्वांना सस्नेह नमस्कार. काल दिनांक -15-02-2026 ला ‘मराठीचे शिलेदार’ हायकू काव्य समूहात माझ्या “हायकू काव्य “रचनेची आजची “सर्वोत्कृष्ट हायकू काव्य रचना ” या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निवडून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम हायकू प्रशासन समितीचे ऋणाभार व्यक्त करते…! तत्पूर्वी थोडेसे मनातले ऋणभाव /अंतर्मनातील काही खास शब्द शिलेदार परिवारासाठी.
“तुमचा फोटो पाठवा” हाच तो तीन शब्दांचा जादुई मेसेज जेव्हा दादांचा येतो ना… काय तो अवर्णनीय आनंद गगनात मावत नाही. मग उत्कंठा शिगेला पोहोचते की, कोणत्या समुहाच्या चौकात आपले सर्वोत्कृष्टचे पोस्टर लावले आहे. आणि कधी कधी आपण ज्या समूहात पहिले पाऊल टाकावे आणि तिथेच ते दृष्टीस पडावे मग तर काय जणू काय १०० किमी प्रवास वाचल्याची वेड्या मनाची होणारी क्षणभर भावना आणि आनंद एकत्र होऊन पुन्हा आनंदाचा बार मनातल्या मनात उडून एक स्मित हास्य चेहऱ्यावर पसरतं.
वेगळीच ऊर्जा लेखणीत संचारते. काल तर भोलेनाथांचा कृपाप्रसाद आहे असंच मनाला वाटलं आणि तेही दर्शन घेण्यापूर्वीच महादेवाने पाठवला असंच वाटलं. खूप मोठा दुर्मिळ योग भोलेबाबाने घडवून आणला (अर्थात माझी श्रद्धा आहे म्हणून मला वाटलं ) आनंदात चिंब भिजलेल्या लेखणीला अशावेळी काहीतरी लिहिण्यासाठी वेळ रिकामा असेल तर नक्कीच सर्व समूहात काहीना काही लिहिल्याशिवाय चैन पडत नाही… पण लगेच लक्षात येतं की ; आजच्या सर्व साहित्यिक प्रकारात कोण कोण सर्वोत्कृष्ट ठरले असतील बरं..! चला त्यांच्या पण आनंदात सहभागी होऊया. कौतुकपर अभिनंदनाचे दोन शब्दपुष्प त्यांना देऊया. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलवूया आणि मग दिलेल्या विषयावर फक्त लेखणीमागे धावूया ती तिचं काम करतेय फक्त साथ देऊया आणि खरंच कधी कधी काही मिनिटातच चारोळी, चित्रचारोळी, हायकू, त्रिवेणी आणि कधी लगेच बालकाव्य सुद्धा अवतरते.
जेव्हा सर्व विषयावर लिखाण होते ना त्यादिवशी खूप छान वाटते कारण काहीका होईना “माय मराठी” लेखणीतून दर्शन घडवते आणि मग आनंद याचा होतो की, आजचा दिवस सत्कारणी लागला…!
आता वेळ ऋणाभाराची. सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा लाखो व्यक्तींना साहित्यिक बनवणारे. माय मराठीसाठी आपला प्रत्येक श्वास घेणारे ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी सौ.सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे, हायकू काव्याचे मुख्य परीक्षक आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा, चित्रचारोळी स्पर्धेच्या मुख्य परीक्षक म्हणजेच माझी सखी सौ. स्वाती मराडे, त्रिवेणीच्या मुख्य परीक्षक प्रिय आ. वृंदाताई, माझ्यासाठी अभिमानास्पद अशी सखी शर्मिला ताई, प्रिय सखी तारकाताई, प्रिय सखी प्रतिमा ताई… साप्ताहिक साहित्यगंधचे सर्व संपादक मंडळ. अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद.
माझ्या लेखणीवर कौतुकाचा वर्षाव करणारे, अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद…!…सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा…!!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह



