Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरसाहित्यगंध

पावन श्रावण

डॉ.सौ. मंजूषा साखरकर ता.ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर

0 6 3 9 6 1

पावन श्रावण

चैतन्य घेऊन l आला हा श्रावण
आनंदित मन l धरित्रीचे ll१ ll

श्रावण सरींनी l भिजले हो अंग
झाली सृष्टी दंग l पावसात ll२ll

पर्णोपर्णी नाचे l पावसाचे थेंब
उल्हासित कोंब l भुईपोटी ll ३ ll

हिरवाच शालू l धरेला शोभते
शिवार डोलते l आनंदात ll४ll

पावन श्रावण l रेलचेल त्यात
उत्सव भरास l साऱ्याजागी ll५ll

सप्तरंगी धनू l सृष्टीचे हो दान
विसरते भान l सानथोर ll६ ll

डॉ.सौ. मंजूषा साखरकर
ता.ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 6 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे