Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

‘आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

मराठीचे शिलेदार' तेच मायी पाठशाळा

0 4 8 2 9 7

‘आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

‘मराठीचे शिलेदार’ तेच मायी पाठशाळा

माझ्या ‘प्रेमांगण’ या रचनेला सर्वोत्कृष्ट स्थान मिळाल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे मनःपूर्वक आभार.

सूर गवसला की, कीव आली’

दीड मयना झाला बयीण कायीच सूचत नवते. मनन, चिंतन सप्पा केले. पण पालथ्या घड्यावर पाणी. पक्का पागल झालतो जी..! कोणता नवस करू का? कायी सूचेस नायी. मंग बायकोले मणलं, ‘चाल बयीण कोठंतरी फिराले जावू’. तं ते बी एका पायावर तयार. पण मायी एक अट हाहे मणे तूमी केसाले कारा कलप लावत असाण तं तूमासंग येते नायी तं जा एकटेच, केले बाप्पा केस कारे. आत्ता पाय कसा गबरू जवान दिसतेस मारला टोमणा..! आठ दिस राजस्थान फिरून आलो; असी झ्याक मस्ती केली ना राजे हो, तेथं मंग शब्द बी सूचले आणं दोन रचना लिवून सूनवून टाकल्या, घाडं कौतुक केलं जी त्यायनं. तवा मी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचं नाव घेवून तेच मायी पाठशाळा हाहे हे छाती फुगवून सांगलो.

वापस आलो तं हरूहरू शब्द सूचाले लागले आणं मंग का इचारता, इषय भेटला ‘प्रेमांगण’ लयी आवडीचा, पिरम तं अजून बी ऊफाळूनच वायते, सहा लिवूनच टाकल्या जी. रात्रीले साडे दहा वाजता ‘राहुल’ सर चा मेसेज दिसला ‘तुमचा फटू पाठवा’ मून. इतका आनंद झाला मनून सांगू इचारता सोय नायी. पण कोणती रचना असण कूस बदलत रात काडली आणं दिला एकदाचा फटो. पण मंग माया मनाले प्रश्न पडला का मले ‘सूर गवसला का’ का मी इतके दिस चुपचाप बसलो मून राहुल सराले कीव आली मायी, सहा रचना लिवल्या तं देवून टाक एक सर्वोत्कृष्ट ईची बयीण कटकट गेली.

‘मृद्गंध’ डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे