‘कृतज्ञतेचे शब्दपुष्प अर्पिताना’; राजश्री मिसाळ ढाकणे
'ती' माझ्या लेखणीतून अमर आहे.
‘कृतज्ञतेचे शब्दपुष्प अर्पिताना’; राजश्री मिसाळ ढाकणे
‘ती’ माझ्या लेखणीतून अमर आहे.
“आई नेहमी सांगायची मज
नेहमी संयम बाळगून वाग,
रोग भयंकर सारे जडवितो
विनाकारण नाकावरचा राग..!”
सर्व शिलेदार परिवाराला सस्नेह वंदन आणि राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..!!!
“तुमचा फोटो पाठवा” हे आदरणीय राहुल दादांचे तीनच शब्द, पण त्यात खूप मोठा आनंद, आश्चर्यरुपी कुतूहल दडलेलं असतं…!…सकाळी वेळेवर फोटो पाठवला नाही दोन्ही वेळेस म्हणून दादांनी रात्रीच हा जादुई मेसेज केला की काय असं मला वाटलं. पण यावेळी लगेच फोटो पाठवला आणि नेमकी कशाची निवड झाली असेल? आणि कोणत्या समूहात सर्वोत्कृष्ट पोस्टर असेल?? हे सकाळीच दिसेल म्हणून मी समूहात लिहिले आणि झोपी गेले. सकाळी अर्धी शाळा असल्यामुळे लवकर उठून कामाला लागले. पण लगेच लक्षात आले की दादांनी रात्रीच फोटो मागितला होता. नक्की कोणत्या रचनेचे पोस्टर आहे बघूया. आणि पोस्टर बघता क्षणी एवढा आनंद झाला की, काम थांबवून पुढील चारोळी लिहिली.
“कृतज्ञतेचा शब्द सडा
टाकून फुलविते पहाट
आनंदले मन शुभदिनी
पाहून पोस्टरचा थाट..!”
मग सर्वांना कृतज्ञतापूर्वक हात जोडत जोडत थेट पोस्टर गाठले नि माझीच पोस्टर रचना मी श्वास रोकून वाचली …!..ती माझी नेहमीची सवय आहे; याचे कारण कोणतीही रचना करताना मन अगदी बेधुंद झालेले असते आणि बालकाव्य लिहिताना तर बालपणात रमलेले असते…!… मला वाटलं नव्हतं की, माझ्या ‘नाकावरचा राग’ असा सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकेल…!
काल दिनांक 10-01-2025 रोजी बालकवी समूहात डोकावलं आणि विषय वाचला “नाकावरचा राग ” मला माझं बालपण जीवनातील काही अडचणीचे प्रसंग आठवले आणि माझ्या कठीण प्रसंगात माझी जेव्हा चिडचिड व्हायची, कोणी खोटे बोलले किंवा अन्याय केला की मला खूप राग यायचा आणि आई माझी नेहमी समजूत घालायची… “तू संयम ठेव सर्व काही ठीक होईल…!” रागाला मार… राग मारणारा राजा होतो… होती अडाणी माझी आई पण किती मोठं तत्वज्ञान तिच्यात दडलेलं होतं.
ज्या गोष्टी तिने मला शिकवल्या, सांगितल्या त्या अमूल्य तर आहेतच ; पण आज जी घडले केवळ तिच्या संस्कार मूल्ये आणि जीवनानुभव अंगीकारामुळेच…! म्हणतात ना “अति राग आणि भीक माग ” ते अगदी खरं आहे…माझी आई शिक्षक, डॉक्टर, वकील, तत्वज्ञानी एवढंच काय तिच्यातच देव होता…!… ती माझ्या लेखणीतून अमर आहे… म्हणूनच माझी रचना म्हणजे माझ्या आईचे विचार मा. राहुल दादांनी पोस्टर करून एकार्थी आदरांजली वाहिली असं मला वाटतं…!
रचना लिहिताना अनेक हृदयस्पर्शी प्रसंग डोळ्यासमोर तरळून तर गेलेच पण त्याहीपेक्षा मनोगत लिहिताना भावना दाटून आल्या…!..आज भल्या पहाटे माझ्या पदरात आनंदाचं दान टाकून दिवस उत्साही आनंदी केला… हे सर्व फक्त याच परिवारात घडू शकतं…!!..सर्व आदरणीय दादा ताईंनी प्रेरणादायी, अभिनंदनीय शुभेच्छा वर्षाव करून मनाला आनंदात चिंब चिंब भिजवले मी आपली सदैव ऋणी…!!!
“आजची सर्वोत्कृष्ट बाल काव्यरचना पोस्टर ” या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत माझ्या “नाकावरचा राग” काव्यरचनेची सर्वोत्कृष्ट स्थानी निवड करून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा मुख्य संस्थापक अध्यक्ष.. आदर्श प्रशासक विविध स्पर्धेचे मुख्य आयोजक देवांश, ध्येयवेडे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राहुलदादा पाटील, त्यांच्या अर्धांगिनी आणि संस्थेच्या सचिव प्रिय सौ.पल्लवीताई पाटील, शिलेदार परिवाराच्या मुख्य प्रशासक… मुख्य परीक्षक…संपादक..प्रिय सौ. सविता पाटील ठाकरे, मुख्य प्रशासक परीक्षक संकलक प्रेमळ व्यक्तिमत्व प्रिय सौ. वैशालीताई अंड्रस्कर, प्रिय वृंदाताई,प्रिय सौ. स्वातीताई, प्रिय सुधाताई, प्रिय प्रतिमाताई,प्रिय तारकाताई,प्रिय शर्मिलाताई, आदरणीय श्री विष्णू दादा, संग्राम दादा, अरविंद दादा, अशोक दादा, विकास दादा, हंसराज दादा सर्व शिलेदार प्रशासकीय टीमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
माझ्या “नाकावरचा राग ” सर्वोत्कृष्ट बाल काव्यरचनेवर प्रेरणादायी… कौतुकपर… अभिनंदनीय शुभेच्छा देऊन लेखणीचे बळ वाढविणाऱ्या सर्व सन्माननीय दादा ताईंचे मनःपूर्वक ऋणयुक्त खूप खूप धन्यवाद…!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह



