“आपुलकी वृद्धाश्रमात आमच्या लग्नाचा ४० वा लग्नवाढदिवस उत्साहात”
वसुधा वैभव नाईक, पुणे
“आपुलकी वृद्धाश्रमात आमच्या लग्नाचा ४० वा लग्नवाढदिवस उत्साहात”
वसुधा वैभव नाईक, पुणे
पुणे: दि. 12 मे 2025 आमच्या लग्नाचा 40 सावा वाढदिवस आम्ही ‘आपुलकी वृद्धाश्रम’ आळंदी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून अन्नदान केले. आम्ही पण तेथेच जेवलो. त्या प्रत्येकांना उपयोग होईल येतील अशा वस्तू दिल्या.
तेथील महाराज होते त्यांनी अन्नदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तिथे 25 वृद्ध आहेत. प्रत्येक वृद्धांची आस्तेने चौकशी केली. हे वृद्ध खूप बोलते झाले. त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिले. त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. तासभर तरी गप्पा मारल्या.
माझ्या मुली, नातवंड, मिस्टर सर्वांच्या हातून नेलेले किट वाटप केले. त्यांना माझ्या कविता आणि काही गाणी म्हणून दाखवली. त्यांची अंदाजे तीन तास करमणूक केली. त्यातून बाहेर पडताना जे समाधान मला मिळाले ते शब्दात सांगता येणार नाही. माझ्या मुलांना देखील हे कार्य पुढे कसे चालू ठेवता येईल हे सांगितले ऑलरेडी माझी मुले हे कार्य करतातच. पण नातवंडांनाही हाताशी घेऊन त्यांना सर्व दाखवले. जिव्हाळा, प्रेम काय असतं हे समजावून सांगितले. प्रत्यक्ष अनुभवायला दिले. हे वृद्ध आपल्या तोंडावरून पाठवणं हात फिरवतात तेव्हा खूप छान वाटते.
प्रेम लावल्याशिवाय मिळत नाही हे कसे हे पटवून दिले. कृतीतून समजावून सांगितले.देवाजवळ प्रार्थना एकच आहे की असं वारंवार मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ताकद दे पैसा दे बाकी काही नाही.
वसुधा वैभव नाईक, पुणे