
0
4
0
9
0
3
आजोळ
किती आतुरता असायची
आजोळी जाण्याची तेव्हा
वाट बघायचो एकसारखी
सुटी लागेल शाळेला केव्हा
आजी आजोबांच प्रेम दिसे
जवळ घेताना आपुलकीने
तुपासवे पुरण पोळीचा घास
भरवताना प्रेम वाहते गोडीने
आजोबाची बैलजोडी
साज लय भारी तिचा
सजवलेल्या दमनीत बसने
आनंद विमानात बसल्याचा
मामा मामीचे कुरवाळणे
दही साखरेचे भरवणे
कसे निघून जात दिवस
परत निघावे न वाटणे
माज घरातील आराम
आंब्याच्या माचावर ताव
परत येणार नसे ते दिवस
लपनछ्पण खेळातील डाव
डॉ. श्री. बालाजी राजुरकर
ता. हिंगणघाट जि. वर्धा
0
4
0
9
0
3





