Breaking
ई-पेपरकवितामुंबईसाहित्यगंध

ये दिवाळीत ये..

संजय गरबड मराठे उल्हासनगर, जि. ठाणे

0 6 3 9 6 0

ये दिवाळीत ये..

अंधाराच्या साचलेल्या या काळोखात ये,
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

दुःखाच्या या विझलेल्या प्रत्येक दिव्यावरती,
स्नेहभावाचे तेज तू हळूच लावीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

ज्या वाटेवर कांटे होते विखुरलेले सारे,
त्या वाटेवर फुलांचे सडे तू घालीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

आयुष्याच्या रडक्या या एकाकी कोपऱ्यात,
तुझ्या गोड हास्याचे गाणे गावीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

आठवणींच्या कोळशावर धुमसत होते जे,
त्या निखाऱ्यांना अलगद श्वासाने फुंकीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

नशिबाच्या अंधाऱ्या त्या उंबरठ्यापाशी,
विश्वासाची सुंदर एक रांगोळी काढीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

असेल मनात भीती कुठली जर संकटांची,
अभय देऊन हाताला वरदहस्त फिरवीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

तू विसरून जा आता जुन्या साऱ्या खंत,
प्रेमाच्या या दीपोत्सवी पुन्हा चालीत ये.
‘ये दिवाळीत ये, भावनांना ओवाळीत ये.

संजय गरबड मराठे
उल्हासनगर, जि. ठाणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 6 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे