शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*
*☄विषय : जुना गडी नवा डाव☄*
*????शनिवार : २३/ नोव्हेंबर/२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*निकाल वाचताच कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १४८ साठी सशुल्क साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*जुना गडी नवा डाव*
मांडला खेळ जुना गडी नवा डाव आहे
विजयी होणे सत्ताधारी, हा कावा आहे
राहीले ना एकनिष्ठ कुणी कायम सोबत
बदला बदली पक्ष हा जुनाच डाव आहे
राहणे सत्तेविना, असते अवघड वाटत
सत्तेसाठी खटाटोप,साम दाम दंड आहे
सुरूच घराणेशाही ,पिढीजात वारसाने
दुसऱ्यास राजकारणात कुठे वाव आहे
जमणार नाहीच आता एक हाती सत्ता
घेऊन मित्र पक्षास, सत्ता निर्माण आहे
होईल कमी अधिक,थोडाफार विकास
मतदार राजा मात्र, होतो लिलाव आहे
हीच का लोकशाही,पडतो प्रश्न मनाला
समजते सारे तरी,बाळगलेले मौन आहे
करणे सत्ता बदल, हाती सूत्र जनतेच्या
लागले हाती घेऊन जनता गुमान आहे
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*जुना गडी नवा डाव*
“मागचा अनुभव चांगला
म्हणून आता निवडून आलो ”
“मतदार संघाची चांगली जाण
म्हणून तर आमदार झालो ”
“मतदार राजाने माझ्यावर
लय विश्वास संपादन केला ”
“माझ्याशिवाय वाली नाय
म्हणून माझा विजय झाला ”
“जुना गडी, नवा डाव
आता खेळणार आहे ”
“राहिलेली विकास कामे
पूर्ण करण्यावर भर आहे ”
“सरकार आपलं आलं तर
नक्कीच मंत्री होणार आहे ”
“कित्येक वर्षाचा चांगला
अनुभव माझ्या पाठीशी आहे ”
“मी आणि माझ्या गटाचे
आमदार एकनिष्ठ आहेत ”
“माझ्यावर चांगली जबाबदारी
देण्याचा विचार करत आहेत ”
*श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*जुना गडी नवा डाव*
निवृत्त झाले बाबा
संसार राहिला अपूर्ण
खूष करायचे सर्वांना
जगायचे जीवन पूर्ण….
जुना गडी नवा डाव
साधायचे बर आता
रडत बसायचे नाही
नुसत्याच नको बाता…
कुटुंबीय सारे आपण
कामं एकोप्याने करूया
साहाय्य करुनी कुटुंबाला
संसार छान उभारूया….
आनंदाने जीवन जगूया
समाजात नाव कमवूया
एकमेकांच्या साथीने
जग जिंकण्याची तयारी करूया….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*जुना गडी नवा डाव*
खूप झाल्यात घोषणा
अन् खूप झालेत मोर्चे
जुना गडी नवा डाव
खेळ रंगलेत वरवरचे ॥
मी करतो मारल्यासारखं
तू कर रडल्यासारखं
आतून सारे आपण भाऊ
लोणी खाऊ टाळूवरचं ॥
जनता उपाशी मेली तरी
काय त्याचे सोयरसूतक
हक्कासाठी लढणाऱ्याला
घोषीत केले जाईल मृतक ॥
राजकारण नावाचा
खेळ खेळून पटांगणात
दोन्ही चमूत आपलेच गडी
डाव जिंकून रिंगणात ॥
प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये
घालून झणझणीत अंजन
तू हरल्यासारखं , मी जिंकल्यासारखं
करू मस्त मनोरंजन ॥
डाव नवा असला जरी
गडी मात्र जुनाच
आपले खिसे भरून
जनहिताला मात्र चुनाच ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*जुना गडी नवा डाव*
सत्याची जित पटते कुणाला
राजनीतीने केला झोलझालं आहे
पैशाने दाबले तोंड यांचे; म्हणतात
जुना गडी नवा डाव आहे….
पैसा, दारु, मटणाच्या बोटीत
यांचा संसार चालला आहे
आणि तोंड फाळून सांगतात कसे
जुना गडी नवा डाव आहे….
सतरंज्या, खुर्च्या उचलण्यात
यांचा पूर्ण आयुष्य चालला आहे
गाडीच्या मागे किका मारुन सांगतात
जुना गडी नवा डाव आहे….
पैसा अमाप तुमच्या साहेबांकडं
तुमच्या हातात काय लागतो आहे
साहेबांच्या पोरांची चाकरी करुन म्हणतात
जुना गडी नवा डाव आहे….
आया, बाया विकल्या जरी यांच्या
म्हणतील साहेब आमच्या पाठीशी आहे
आताचं सुधार रे गड्या स्वतःला तू
कारण तुझा साहेब स्वतःला विकणार आहे….!
*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*जुना गडी नवा डाव*
दरदिसी उगवणारा रवीही
सृष्टीतील बदलाची वाट पाहे
कधी येईल नवा धुरंधर इथे
का नेहमी जुना गडी नवा डाव आहे
जळमटे जातींची विचारांवर
योजनांनी माणूस लाडावला आहे
समतेची फुंकण्या कर्कश तुतारी
जनता नव्या गड्याची वाट पाहे
खितपत पडला तरूण इथला
म्हणतात रोजगाराला वाव आहे
भ्रष्टाचार वाढला गल्लीबोळात
काळ्या बाजारात मी साव आहे
जुना गडी नवा डाव आहे
वाहतात वारे समृद्धीचे त्यात
लागवडीच्या जमिनीवर घाव आहे
स्वयं विकासासाठी मी पुन्हा येणार
जुन्या गड्याचा नवा डाव आहे
युती करून विकास असो
अथवा विकासासाठी युती असो
शेतमालाला शुन्यच भाव आहे
विकास अजून पाहिजे ही हाव आहे
जुना गडी नवा डाव आहे
*कु.संगिता रामटेके/भोवते*
*साकोली भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*जुना गडी नवा डाव*
फुटला भ्रमाचा भोपळा
जनतेच्या काळजावर घाव
बोलत होते एक केले दुसरे
जुना गडी नवा डाव
लोकशाही बसली धाब्यावर
संविधानाची ऐशी की तैशी
खुर्ची साठी हापापलेले
टपून बसलेले हौशी
कुटील कारस्थान रचले
मतदार राजाच्या डोळ्यात धूळ
निकाल ऐकून तोंडात बोट
पाठीत खंजीर कि त्रिशूळ
घराणेशाही राजेशाही
लोकशाहीत मनमोकळी नांदते
कोणी काही करू शकत नाही
दडपशाही दंडमशाही नाचते
ज्याच्या हाती सत्ता
तोच हुकूमशाही राजा
बेहाल जीने जगते
गरीब बिचारी प्रजा
आनंदोत्सव गुलाबी गुलाल
मनामनात सल तरी बेहत्तर
खाजगीकरणाकडे वाटचाल
लोकशाहीचे तुटले लक्तर
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*जुना गडी नवा डाव*
झाले गेले विसरून सारे
सोडून देऊ चल बेबनाव..
पुन्हा ससांर खेळ मांडू या
ह्या वेळी जुना गडी नवा डाव..
अहंकाराचे नको रे वर्तन..
एकमेकांची अक्कल काढायचे
नको रे पुनःश्च आवर्तन…
तु ही संशयाला मनी
देऊ नको थारा..
बघ मग मी कसा
काटेकोरपणे
जपते संसार सारा..
दमून येतो दोघे ही
म्हणून वाटून येऊ काम..
फक्त एकाचा जीवावर नको
दोघांनाही मिळू दे समान आराम…
तारूण्याचे निर्माल्य होण्यापूर्वी
चल देऊया एकमेकाला संधी..
संसार बागेला बहर येऊ दे
प्रेम वेल पसरू दे स्वच्छंदी..
मग काय करतो विचार
जाणते मी तुझ्या मनी मीच
दिलेला अपमानाचा घाव….
विसरून जाऊ भूतकाळा दोघेही
चल पुन्हा एकदा रंगवू मायेने
जुना गड्या सोबत संसाराचा नवा डाव…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





