Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन शी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि अलिबाग – मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व भारती डायग्नोस्टिक च्या वतीने रक्टगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पवार, शाळा समिती अध्यक्षा प्रवीणा भगत,उपसरपंच जयेंद्र भगत यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. अलिबाग – मुरुड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. वैभव भगत, डॉ. अमेय केळकर, डॉ. ओमकार पाटील, डॉ. वैजेश पाटील,
डॉ. समीर धाटावकर, डॉ. गणेश गवळी, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ. भूषण शेळके, डॉ. संकेत मोरे, डॉ. यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्त प्रमाण, दातांची तपासणी करून मोफत औषधं दिली.

यावेळी भारती डायग्नोस्टिक चे राकेश थळे, रायगड फोटोग्राफर्स अॅड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, शाळेचे मुख्याध्यापिका सुगंधा पाटील, सह शिक्षक चंद्रकांत काटकर, नितीन पाटील, संध्या कडू,
वाडगावच्या माजी सरपंच सरिता भगत, बापदेव सामाजिक संस्थेचे सचिव प्रभाकर भगत, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सदस्य अमर मढवी, अभिजित काटकर, विजय पाटील, गणेश जाधव, योगेश सावंत, सुनील भगत व विद्यार्थी उपस्थित होते.

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात.त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील घटकाला चांगल्या पध्दतीने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने वाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व रक्टगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 63 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्टगट तपासणी करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे