0
4
8
2
9
4
खडतर वाट
कितीही संकटे आली, कठीण वाटत नाही
पण विरहाचे घाव मात्र सोसले जात नाही
खडतर असला मार्ग तरी चालत जावे पुढे
सुर्याविना येईल अशी कुठली प्रभात नाही
संघर्ष संपत नसतो तो तर सुरूच असतो
त्याविना कधी किर्ती पसरत नभात नाही
जरी साहते वेदना पण तिलाही मन आहे
सागरासारखी खोली तिच्या ह्रदयात नाही
चढ कधी उतार येतात जातात आयुष्यात
संघर्षाविना कुणाची इथे गेली हयात नाही
इतके कठोर मन कुणाचे व्हावे नको देवा
आसवे दिले तळहाती तरी कंठ दाटत नाही
फुलांनाही द्यावा लागतो जीव सूगंधासाठी
त्याशिवाय अत्तर कुपीतही साठत नाही
वेचत जावे काटे फुले सांडत जावे जाताना
खडतर वाटेविना कुणी क्षितिज गाठत नाही
मोहिनी निनावे
आनंद नगर, नागपूर
0
4
8
2
9
4



