Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

जे.एस.एम. महाविद्यालयात ‘नो व्हेईकल डे’ (विना – वाहन दिन) संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 4

जे.एस.एम. महाविद्यालयात ‘नो व्हेईकल डे’ (विना – वाहन दिन) संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी आय. क्यु. ए. सी. व एनर्जी कंझर्व्हेशन, वेस्ट मॅनेजमेंट आणि ग्रीन आॅडीट कमिटीतर्फे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डाॅ. प्रीती फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात आला.

वायू व ध्वनी प्रदुषण रोखणे, इंधनाचा कमी वापर व संवर्धन, कार्बन उत्सर्जन रोखणे व नियंत्रित करणे तसेच पर्यावरण जनजागृती या प्रमुख उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्वांनी या दिवशी कोणतेही स्वयंचलीत वाहन न वापरता कॉलेजमध्ये येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, सायकल व पायी येण्याचा पर्याय निवडला. यानिमित्ताने पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे, ई-वाहनांचा वापर करणे, सायकलचा वापर करणे असे पर्याय निवडण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले.

कार्यक्रमासाठी Energy Conservation, Waste Management and Green Audit Committee च्या प्रमुख प्रा.डॉ. प्रिती फाटे, कमिटी सदस्य प्रा. अद्वैत घाटपांडे, प्रा. प्रशांत चाटे, प्रा. डी. जी. खंडारे, प्रा. सुनिल आनंद, प्रा. पूनम पाटील, श्री. सी. जी. मोरे यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे