0
4
8
2
9
3
खुल्लमखुल्ला
विचार माणसाचे, आहेत संकुचित।
पराजित जीवनी , तरी मानतो जित।।
सत्य असत्य काय , कळलं नाही कोडं।
बंद कळी सुगंधी , सुमनी पुलकित।।
जन्म म्रुत्यु सदैव , सोबत असताना।
मुहूर्ते नसताना , का पाळते भाकीत।।
सखे परके कोण ,ओळख माणसा तु।
काही पडले नाही , तुझ्या धर्म जातीत।।
जिवलग असतो , दुःखात धावणारा।
रक्तास विसरून , होऊ नका व्यथित।।
अणुकरण करा , निसर्ग नियमांचे।
सगळे नाहीतरी , मिळणार मातीत।।
खुल्लमखुल्ला बोलू , मनी नको संकोच।
सार्थकी करु आता , जीवन समर्पित।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा जि .यवतमाळ
============
0
4
8
2
9
3



