आयसीएमए परीक्षेत सानिका पारखेचे घवघवीत यश; अलिबाग तालुक्यातील 2026 बॅच मधील एकमेव यशस्वी विद्यार्थिनी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आयसीएमए परीक्षेत सानिका पारखेचे घवघवीत यश; अलिबाग तालुक्यातील 2026 बॅच मधील एकमेव यशस्वी विद्यार्थिनी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग,(दि. 7 ऑगस्ट ): अलिबाग तालुक्यातील सानिका पारखे हिने दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झालेल्या आयसीएमए (इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अलिबाग तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेत यश मिळवणारी ती अलिबाग तालुक्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
सानिका ही अश्विनी टीचर यांच्या वाणिज्य (कॉमर्स) वर्गाची माजी विद्यार्थिनी असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अश्विनी टीचर यांनी तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयसीएमए ही देशातील वाणिज्य, लेखांकन, खर्च लेखांकन, आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक पात्रता मानली जाते. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, विषयांवरील सखोल आकलन आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. अशा स्पर्धात्मक परीक्षेत सानिकाने मिळविलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे.
सानिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्यावर कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


