Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी व पीअर एज्युकेटर यांचे प्रशिक्षण उत्साहात

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 2 0 2 4

जे. एस. एम. महाविद्यालयात रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी व पीअर एज्युकेटर यांचे प्रशिक्षण उत्साहात

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग : एचआयव्ही/एड्सविषयी युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षित वर्तन आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील रेड रिबन क्लबचे नोडल अधिकारी व पीअर एज्युकेटर यांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

मा. डॉ. सुनील भोकरे (भा.प्र.से.), आयुक्त (शहरी आरोग्य) तथा प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई तसेच मा. डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोशनी कदम, उपसंचालक (IEC) तथा पालक अधिकारी (DAPCU रायगड), महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या नियोजनानुसार हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग आणि जे. एस. एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणात रायगड जिल्ह्यातील २४ महाविद्यालयांमधील रेड रिबन क्लबचे नोडल अधिकारी व पीअर एज्युकेटर सहभागी झाले.

कार्यक्रमात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने यांनी एचआयव्ही/एड्सविषयी युवकांमध्ये अचूक माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी रेड रिबन क्लबची भूमिका स्पष्ट केली. नोडल अधिकारी व पीअर एज्युकेटर यांनी महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविणे, विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे तसेच एचआयव्ही संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी, युवकांचा सहभाग, जनजागृती उपक्रमांचे नियोजन आणि समाजातील एचआयव्हीशी संबंधित गैरसमज व कलंक दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. एचआयव्हीमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, रेड रिबन क्लब हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे प्रतिपादन करण्यात आले.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष Adv. डॉ. गौतम पाटील यांनी शुभेच्छा संदेश देत प्रशिक्षणार्थींना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. त्यांनी रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालयीन युवक यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली.

लेखाधिकारी श्री रवींद्र कदम यांनी आर आर सी. ऑडिट विषयी उपस्थिताना माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी युवकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी लेखाधिकारी श्री. रवींद्र कदम, समुपदेशक श्री. अक्षय बेरंड, विभागीय समन्वयक डॉ. अनिल झेंडे, डॉ. दत्तात्रय हिंगमिरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत तसेच रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील रेड रिबन क्लबचे नोडल अधिकारी, पीअर एज्युकेटर व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले. या प्रशिक्षणामुळे रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी शास्त्रीय माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्यविषयक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी रेड रिबन क्लबच्या माध्यमातून विविध प्रभावी उपक्रम राबविण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 2 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे