
0
4
0
9
0
3
तो चंद्र
तो चंद्र खुणावतोय
शरद पुनव राती
दुग्ध शर्करा प्राशुनी
तत्पर व्हा कोजागर्ती
तो चंद्र हवाहवासा
वाटतो चराचरांना
चांदणे नभांगणी रे
खुणावती तारकांना
तो चंद्र तेजस्वी पहा
आमंत्रित करण्या आला
कोजागरी पुनवेला
अल्पसा काळ राहिला
तो चंद्र नभीचा तारा
निखळ तेज पुंजका
देईल तो सकलांना
दूध घुटका घुटका
तो चंद्र मनभावन
असे निश्चल पावन
कोजागरी पुनवेला
करू या दुग्ध प्राशन
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
तुरोरी जि.धाराशिव
0
4
0
9
0
3





