
0
4
0
9
0
3
विजयादशमी
धम्मचक्र बाबांचा
जगावरी फिरू दे
धम्म सोहळा बघण्या
नागपूरला जाऊ दे
देश विदेशातून येती
आमचे बौद्ध बांधव
करून मनाला परिवर्तन
करती एक नवा अभिनव
निर्धार केले बाबांनी
जन्मलो हिंदू धर्मात
पण मारणार नाही तिथे
मरणार मी बौद्ध धम्मात
नागपूरच्या पवित्र भूमीवर
केले बाबांनी विजयोत्सव
धम्माची दिली दीक्षा लाखो लोकांना
विजयादशमी हा केला अभिनव
वाईट रूढींना त्यागून त्यांनी
केला स्वीकार सद्गुणांचा
स्वमनावर मिळवून विजय
केला स्वीकार बौद्ध तत्वांचा
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
4
0
9
0
3





