
0
4
0
9
0
3
अर्धचंद्र
चंदूमामा चंदूमामा
छान छान तुज घर
नेणा मला तुझ्या घरी
राहीन मी तुझ्यासवे वर
किती मौज वाटेल मला
आकाशात फिरतांना
बघेन मी जवळून लुप्त
चांदण्या पुन्हा उजळतांना
भव्य दिव्य तुझे नभांगण
चंद्रमा जणू राजा तू नभीचा
कधी पूर्ण तर कधी अर्धचंद्र
हेवा वाटे मज तुझ्या कलेचा
अमावास्येला दिसेनासा तर
पोर्णिमेला पूर्ण गोलाकार
भारीच निसर्गाची किमया
नित्य बदतात तुझे आकार
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल जि.चंद्रपूर
=========
0
4
0
9
0
3





