अलिबागई-पेपरकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
क्षण दुराव्याचा
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे

0
4
0
9
0
3
क्षण दुराव्याचा
क्षण दुराव्याचा येता
जीव कासावीस झाला
आठवणींच्या हिंदोळ्यावर
क्षण निसटून गेला
घडले सारेच अकल्पित
तू दूर दूर गेलीस
माझ्या आसवांची धार
आज ओथंबून नेलीस
काय होता माझा गुन्हा
मला कळलेच नाही
तुझ्यामाझ्यात अंतराचे
कारण उरलेच काही
हा दुरावा नाहीच
झाला आत्मघात आहे
तू केलास माझ्याशी
असा विश्वासघात आहे
तुला तुझा मार्ग मोकळा
मी अडकलो बंधनात
तुझीच उरली आठवण
माझ्या हृदयाच्या स्पंदनांत
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
0
9
0
3





