0
4
8
2
9
3
आठवणी…
हात सुटले साथ तुटली
तू नाही जरी सोबतीला
तुझ्या अनंत आठवणी
आहेत माझ्या दिमतीला.. //
असतो जेव्हा एकांतात
कधी खूपच सतावतात
तर कधी उदासी छायेत
त्याच मनास सुखावतात.. //
कधी हताश मलूल होता
जवळ येऊन खुलवतात
निस्तेजलेल्या चेहर्यावर
हलकेच हास्य फुलवतात.. //
दुरावली तू तरीही उरात
काहूर असेच माजवतात
निद्रिस्त भाव भावनांना
मग नकळतच जागवतात.. //
तुझे परतणे असंभव तरी
हा स्वप्नमहाल सजवतात
आभासी जगात मजला
त्या तासनतास रमवतात.. //
विष्णू संकपाळ, बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3



